शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘बोल’ जयंत पाटील यांचे, ‘हल्ला’ सदाभाऊंवर,इस्लामपुरात आज राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:53 IST

इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले

ठळक मुद्दे हल्लाबोल यात्रा : , नेत्यांच्या भाषणांकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

अशोक पाटील ।इस्लामपूर : राजारामबापू पाटील यांच्या पश्चात राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्याच्या राजकीय इतिहासात कधीच हार मानली नाही. राजकीय बाह्यशक्तीपुढेही ते नमले नाहीत. अगदी मोदी लटेतही ते तरले. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बसून सोडलेले सदाभाऊ अस्त्र राष्ट्रवादीला धक्के देऊ लागले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत हेच ‘टार्गेट’ राहणार आहेत.

राजकारणात प्रवेश केल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची खाती त्यांनी सक्षमपणे सांभाळली. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत त्यांचे नाव होते. इस्लामपूर मतदारसंघात वसंतदादा घराण्यातील नेते आणि पतंगराव कदम यांनी जयंतविरोधी नेतृत्वाला खतपाणी घातले; परंतु ते वाया गेले.

गत लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांनी महाआघाडीत सामील होऊन जयंत पाटील यांना अडचणीत आणले होते. मोदी लाटेचा फायदा शेट्टी यांना झाला. विधानसभेला मात्र जयंतविरोधी नेत्यांमध्ये बिघाडी झाली. कॉँग्रेस, शिवसेनेचा सवतासुभा, बळीराजाचे बी. जी. पाटील यांची वेगळी भूमिका पाटील यांच्या पथ्यावर पडली. राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीतील मातब्बरांना धक्के बसले. शिराळ्यात राष्टÑवादीच्या मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला. पाटील यांना विधानसभेत विरोधी गटनेते पदावर समाधान मानावे लागले.

सदाभाऊंना मंत्रीपद मिळाल्यापासून त्यांनी राष्ट्रवादीला धक्कातंत्र देण्यास सुरुवात केली आहेत. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये घेऊन त्यांनी पहिला धक्का दिला. शिवाय ३१ वर्षांची सत्ता उलथवण्याची कामगिरीही पार पाडली. त्यावेळी केवळ जयंत पाटील यांनाच टार्गेट केले गेले. याचा वचपा काढण्यासाठी जयंत पाटीलही सरसावले आहेत. गुरुवारी इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात जाहीर सभा होणार आहे. या सभेत भाजपबरोबरच सदाभाऊ खोत यांनाच टार्गेट केले जाणार आहे.कोणाचाच असर नाही!वाळवा-शिराळ्यात आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे कधीही सख्य जमले नाही. युती सरकारच्या काळात अण्णासाहेब डांगे, शिवाजीराव नाईक मंत्री होते. मात्र त्यांचीही मात्रा जयंत पाटील यांच्यावर लागू झाली नाही. उलट नंतर डांगे यांनी पाटील यांच्यासोबत येऊन राष्ट्रवादीला बळ दिले.